Thursday 21 March 2013

. नको असलेले, नको त्यांचे आणि नको तिथे मिळणारे धक्के खात शेवटी जावेच लागते. स्वतःला सांभाळायचे की स्वतःच्या अब्रूला... याचे भान ठेवण्याइतपत देखील भान राहत नाही. कधी घडून जाते हे सारं कळतं पण हे काही घडूच नये अशी मनात इच्छा येईपर्यंत सारंच काही घडून गेलेले असते... अवघ्या काही सेकंदातच. असेही नाही की हे सारे टाळावे कायमचे.. पण नाईला... ते सारे रोज घडते, अनिर्वातपणे.

. कुणावर ताबा ठेवावा? स्वतःवर की त्या नको असणा-या माणसांवर..? एक वेळ स्वतःवर ताबा ठेवता येईलही, पण त्यांच्यावर... त्यांना कोण समजवणार? कदाचित त्यांच्यापॅकी कित्येकजणांना माझ्यासारखेच वाटत असेल.. पण त्या सा-यांचा माझ्यासारखाच नाइलाज.

. "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?"
. या ओळीचा अर्थ मला आज पुरेपूर समजला, मुळात मला समजून घ्यावा लागला.
.
. हे सारं कशासाठी? "पोटासाठी"
. दुसरा काही उपाय नाही? "कदाचित नाहीच"
. पण म्हणून काय हे सारं सहन करायचं? स्वतःची अब्रू देखील सांभाळता येऊ नये इतपत...?
. करावेच लागेल... झाडाला मोठ व्हायचं असेल तर बंद जमिनीतून कोंब काढून बाहेर यावेच लागते.

. रोजचा प्रवास जरी तोच असला, रोजची वाट जरी तीच असली तरी रोज भेटणारी माणसं... माणसं मात्र बदलतच जातातं... वेळेनुसार, अंतरानुसार.... निरनिराळ्या जातीची... वयाची...!

. कॅफियत सांगू तरी कुणाला? सारेच मग्न आपापल्या कामात... इथे वेळ कुणाला आहे... माझी कॅफियत एकायला.. सारेच स्वतःमध्ये गुंतलेले.. "ध्यान देवळात चित्त पायथानात ठेवून रमलेले" त्यांना कुठे वेळ आहे, पण त्यांच्यामध्येही तिच खंत.... जी माझ्या मनात..

. मी..... मी कोण...? फक्त एक प्रवासी... गाडीचे निमित्त साधून जीवनाची वाट चालणारी एक प्रवासी... जीवानाची, आयुष्याची... न तुडवलेल्या आणि तुडवून तुड्वून झिजलेल्या वाटांची मी... मी एक प्रवासी.

. प्रवासी... ज्याने कधीच आपल्या मागण्यांची, इच्छांची पूर्तता होईल याची अपेक्षा बाळगायची नसते.. चालत राहायचे.... अखंडपणे-झिजेपर्यंत.... कोणाचीही पर्वा न करता.. स्वतःची... आणि स्वतःच्या.........???????????????

No comments:

Post a Comment