Sunday 5 May 2013

"रक्ताची नाती रक्ताला जाणतात" हे वाक्य कितपतं खरे आहे हो?

असा प्रश्न जर मी कुणाला केला तर मला नाही वाटत की कुणाला याचे नेमके उत्तर देता येईल. उत्तर न देण्याचे कारण शोधण्याची फारसी गरज काय मला वाटली नाही.

मी आणखी एक अशीच म्हण एकली आहे, "आगच आगीला विजवू शकते" पण मजेशीर बाब अशी की या म्हणीत स्वतः आग समोरच्या आगीला(ज्वलंत) संपवण्यात गॅर मानत नाही. म्हणजे ती आग स्वतः तर जळत नाहीच पण दुस-या आगीला पण जळू देत नाही... की हास्यास्पद आहे ही गोष्ट....

असेच काही तरी रक्ताच्या नात्याबद्दल असावे का? प्रश्न पडला. उत्तर शोधायची हॉस वाटली.
"रक्ताचे नाते रक्ताला जाणते"
माझ्या मते तरी हे वाक्य कुणीतरी एखाद्या हास्यसंम्मेलनात म्हणावे आणि समोरच्या पर्यवेक्षकाने  त्याला पॅकीच्या पॅकी गुण द्यावे अशातले आहे.

कारण जर सायन्सच्या दृष्टीकोनातून पाहीले तर.... मानवी मिलनामध्ये पुरूष आणि स्त्री हे दोन वेगवेगळ्या कुटूंबातले मग या दोघांचे रक्तसुद्धा वेगवेगळे असणार.मग दोघातून जन्माला आलेले मुल, त्याचे रक्त कुणाचे??? मात्याचे की पित्याचे???

साहजिकच ते मुल आईच्या पोटार ९ महीने राहीले, पुढे आईच्याच दुधावर वाढले मग त्या मुलात आईचेच रक्त असायला हवे, यात मला तरी शंका वाटत नाही.

मुलाला जन्म देतेवेळी आईचे रक्त A+ असल्याचे समजले. आईला तिच्या प्रसुतीच्या काळात बाहेरून रक्त द्यायचे होते म्हणून तिच्या नव-याचे रक्त चालते का हे पाहण्यासाठी बापाचेही रक्त तपासले.... पण बापाचे रक्त B+ निघाले... मग आता बापाचे रक्त आईला कसे काय चालणार???

मुलगा मोठा झाला.... शाळेत प्रवेश घेताना त्यांनी मुलाचे रक्तगट तपासायला सांगितले... आणि काय मज्जा मुलगा चक्क O+ निघाला.

मग आता रक्ताचा / रक्तगटाचा सुत्राचा धागा कुठे जुळतो का हो?
आईचे रक्तगट A+ बापाचे रक्त B+ मग मुलाचे रक्तगट A+B+ का नाही?

माझे हे मत मी माझ्या जवळच्या मित्राला एकवल्यानंतर त्याने मला सांगितले, दोन भिन्न रक्तगट असणारे रक्त एकमेकांत मिसळून घेत नाही, मग जन्मणारे मुल A+B+ कसे काय असणार???

मला त्याचे बोलणे काही स्तरापर्यंत समजले. यापुढे त्या विधानाबद्दल आणखी काही बोलण्याची माझी इच्छा नाही. पण एक निष्कर्ष मात्र मी तयार केला. तो कितपत बरोबर नि चुकीचा याचा विचार प्रत्येकाने आपापल्या परीने करावा.

दिसायला सारखे असणारे लाल रंगाचे रक्त, त्या रक्ताचे पडलेले उपगट(किंवा पाडलेले), डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दोन भिन्न उपगट एकमेकांत मिसळू शकत नाहीत, किंवा मिसळण्याचा प्रयत्न केला की काहीच निष्पन्न होत नाही.
तसच काही माणसांच आहे. माणसाने माणसांतही उपगट पाड्ले आहे. थोडक्यात धर्म पाडले आहेत. दोन एकसमान धर्मगट असणारी माणसे एकत्र येत नाही, एकमेकांत मिसळत नाही. आणि जर मिसळवण्याचा प्रयत्न केला तर निर्माण होतात ते वाद, भांडण, तंटा....

धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment